डोणगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी


 

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज सार्वजनिक, शासकीय तसेच घरोघरी  शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. त्याप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोणगाव येथे आज सकाळी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

    पत्रकार तथा अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव संतोष बारगजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पोपट जमदाडे ग्रामपंचायत सदस्य आबासाहेब पोठरे महाराष्ट्र प्रशिक्षण विकास केंद्र डोणगावचे संस्थापक शिवाजी सातव,  सामाजिक कार्यकर्ते पोपट फुले, राजेंद्र धनवे,सूरज धनवे शाळेचे मुख्याध्यापक रामदास गंभीरे सर, संभाजी कोकाटे सर, दत्तात्रय उदारे सर, हिरनाथ चव्हाण सर,भानुदास फुलमाळी सर, उपस्थित होते.


 

    यावेळी मान्यवरांनी आपले विचार मांडले त्याचबरोबर, चैतन्य वारे , कार्तिकी सातव, प्रतिक्षा यादव, सृष्टी यादव या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अतिशय सुंदर अशी भाषणे केली

Post a Comment

Previous Post Next Post