महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
आष्टी शहरातील अशोक गर्जे, विकास गर्जे, संदीप गर्जे या तिघा भावंडांचे जामखेड शहरांमध्ये श्री ऑप्टिकल्स, झगडे हॉस्पिटल या ठिकाणी अकरा वर्षापासून रुग्णसेवा देत होते. तेथून त्यांनी आपल्या दुकानाचे स्थलांतर केले आहे.
जामखेड बस स्थानकाच्या जवळ नगर जामखेड रस्त्यावर रविवारी १९ फेब्रुवारीला त्यांच्या आई सौ. कुसुम गर्जे व वडील श्री.त्रिंबक गर्जे यांच्या शुभहस्ते नवीन अद्यावत दालनाचा शुभारंभ केला.या नवीन जागेत सुरू केलेल्या दुकानाचे नाव श्री गणेश ऑप्टिकल्स अँड आय केअर असे आहे.या नवीन दालनात स्वतंत्र तपासणी, चष्मे, गॉगल, या सर्व सुविधा त्यांनी एकाच ठिकाणी ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत.
रुग्णांना अल्प दरात नेत्र तपासणी व सर्व प्रकारच्या डोळ्यांच्या ऑपरेशन विषयी योग्य मार्गदर्शन येथे केले जाणार आहे या शोरूम मध्ये TITAN, FASTRACK,IDEE या नामांकित कंपन्यांचे गॉगल्स व फ्रेम उपलब्ध करण्यात आले आहेत. या कार्यक्रमासाठी गार्डन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते पैलवान निलेश भाऊ गायवळ, डॉ. गणेश झगडे, डॉ. नाना जरे, डॉ. विद्या तोंडे ,डॉ. राम सानप ,डॉ. सचिन टेकाडे ,डॉ. वराट, डॉ. अशोक बांगर, डॉ. मिसाळ, डॉ. जालिंदर वांढरे, सरपंच संतोष पालवे मेहेकरी, अतुल कोठुळे ,डॉ. संजय सांगळे, या मान्यवरांच्या व नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला.
श्री गणेश ऑप्टिकल्स अँड आय केअर ची सुरुवात१९९७ पासून आष्टी शहरात झालेली आहे व जामखेड शहरांमध्ये गेल्या अकरा वर्षांपासून या सेवेत आहेत. त्यामुळे जामखेड शहरातील व परिसरातील ग्राहकांचा त्यांच्यावर विश्वास असल्याने येथे ग्राहकांची पहिली पसंती आमच्या दुकानाला मिळत आहे असे विकास गर्जे यांनी यावेळी सांगितले.
Tags
जामखेड

