1 मे जामखेड पोलीस ठाण्याच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 
१ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जामखेड पोलीस ठाण्याच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिली. 

दि. १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. जामखेड पोलीस स्टेशन या ठिकाणी होणाऱ्या या रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे. 
जामखेड तालुक्यातील तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे तुमच्या दिलेल्या रक्तामुळे अनेक गरजूंचे प्राण वाचतील रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे त्यामुळे जामखेड पोलीस ठाण्याच्या या उपक्रमात सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले आहे.

ठिकाण जामखेड पोलिस स्टेशन
वेळ सकाळी 09 ते  सायंकाळी 05 वा. पर्यंत

ad

Post a Comment

Previous Post Next Post