महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
जामखेड तालुक्यातील दिघोळ व जवळा परिसरात आज वादळी वाऱ्यामुळे वीज पडून दोन दुर्दैवी घटना घडल्या आहेतदिघोळ तालुका जामखेड येथील रहिवासी भिमराव बाजीराव दगडे (वय ६५ वर्षे) यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. तर दुसरीकडे जवळा परिसरातील मुंजेवाडी येथे विज पडून दशरथ शिवाजी लहाने या शेतकऱ्याच्या दोन बैलांचा मृत्यू झाला आहे.
जामखेड तालुक्यातील दिघोळ येथे आज दि. २८ एप्रिल रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास अचानक वादळ व गारांचा पाऊस सुरू झाला. दरम्यान गट नंबर २३ मधील शेतात गुरे चारत असताना व त्यांच्यासाठी चारा कापत असलेल्या ६५ वर्षीय शेतकरी भिमराव बाजीराव दगडे रा. दिघोळ यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
ही घटना समजताच दिघोळचे सरपंच नानासाहेब गिते यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत सदर ठिकाण जाऊन मयत भिमराव बाजीराव दगडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात आणला.
तर महसूल विभागाच्या वतीने सदर घटनेचा पंचनामा करण्यात येत आहे.
आज जामखेड तालुक्यात विज पडण्याची दुसरी घटना घडली असून या घटनेत जवळा परिसरातील मुंजेवाडी येथे विज पडून दशरथ शिवाजी लहाने या शेतकऱ्याचे दोन बैलांचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे.
दुसरी घटना मुंजेवाडी येथे दशरथ शिवाजी लहाने या शेतकऱ्याच्या दोन बैलांवर विज पडून मृत्यू झाला.
या दोन्ही घटनांबाबत तहसीलदार योगेश चंद्रे यांनी योग्य ती दखल घेत तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.