महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
जामखेड तालुक्यातील डोणगाव या गावचे भुमिपुत्र जामखेड पंचायत समिती चे नवनिर्वाचित गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांचा सत्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोणगाव आणि ग्रामपंचायत डोणगाव च्या वतीने करण्यात आला.या कार्यक्रमाप्रसंगी संकल्प बहुउद्देश्यीय ग्रामविकास संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेची माहिती देत असताना पुरस्कार जाहीर करण्यात आले.
सालाबादप्रमाणे यावर्षीही संकल्प बहुउद्देश्यीय ग्रामविकास संस्थेच्या वतीने सामाजिक, राजकीय, धार्मिक, पत्रकारीता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात येतो.यामध्ये सामाजिक क्षेत्रात बिभिषण यादव ( पोलीस पाटील) यांना समाजभूषण व पत्रकारीता क्षेत्रात दैनिक सुर्योदय जामखेड तालुका प्रतिनिधी युवा पत्रकार धनराज पवार यांना पत्रकार रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला.
पुरस्काराचे स्वरूप शाल,श्रीफळ व सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात येईल असे प्रतिपादिन संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव सातव व हभप श्रीपती पवळ यांनी जाहिर केले .
संकल्प बहुउद्देश्यीय ग्रामविकास संस्था महाराष्ट्र राज्य ही संस्था शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून विविध उपक्रमांचे आयोजन करुन समाज जागृत व शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्याचे कार्य करते.जामखेड तालुक्यासह संपुर्ण राज्यातील महाराष्ट्र शासन तरुणांना विविध उद्योगांमध्ये नोकऱ्या व स्वतःचे उद्योग उभारण्यासाठी उत्कृष्ट असे तांत्रिक प्रशिक्षण घेता यावे यासाठी जामखेड तालुक्यातील डोणगाव येथील संकल्प बहुउद्देशीय ग्रामविकास संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेने महाराष्ट्र प्रशिक्षण विकास केंद्राची स्थापना केली असून या ठिकाणी या अंतर्गत नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कार्पोरेशन दिल्ली ची मान्यता असलेले प्रमुख असे इलेक्ट्रीकल कोर्स, हेल्थ केअर, ब्युटीशियन, वेल्डिंग, बांधकाम, सी.एन.सी. सेंटर कम ऑपरेटर तर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त असे बांधकाम पर्यवेक्षक हस्तकला व कार्यानुभव शिक्षक प्रमाणपत्र कोर्स प्रि - प्रायमरी कोर्स अशा प्रमुख कोर्सेस सह विविध असे दोनशे कोर्स तसेच ग्रामीण भागातील तरुणांना उद्योजक होण्याची संधी दिली आहे.
डोणगाव चे पोलीस पाटील बिभिषण यादव यांनी नेहमीच सामाजिक चळवळीत काम केले असून त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखणे, गावपातळीवर किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रातील गुन्ह्याची माहिती पोलीस ठाण्यास देणे,नैसर्गिक आपत्ती व रोगराई या गोष्टींचा अहवाल वरिष्ठांना देणे. गावात अनैसर्गिक किंवा संशयास्पद मृत्यू झाला असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना देणे. तसेच कोरोना काळात उत्कृष्ट काम केले असून नागरिकांचे प्रश्न या विविध माध्यमातून त्यांनी कामे केली आहे.याच कार्याची दखल घेत संकल्प बहुउद्देश्यीय ग्रामविकास संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने समाजभुषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून तसेच जामखेड शहरातील युवा पत्रकार धनराज पवार हे गेल्या २ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्रात वंचित, पिडीत,बहुजन घटकांचे विविध विषयांवरील प्रश्नांना वाचा फोडणारे पत्रकार असून त्यांनी कोरोना काळात रुग्ण, नागरिकांचे प्रश्न पत्रकारीतेच्या माध्यमातून सोडवले,शासनाच्या विविध योजनांना प्रसिद्धि देवून नेहमीच सहकार्य तसेच सामाजिक कार्यात पुढाकार घेवून नेहमीच कार्यरत असतात अशा उल्लेखनीय कामगिरीबद्दल पत्रकार धनराज पवार यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.लवकर च पुरस्कार वितरणाची तारीख जाहीर करण्यात येईल.