महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
जामखेड तालुक्यातील जेष्ठ पत्रकार शिवाजी ईकडे यांच्या मातोश्री आसराबाई सोपान ईकडे यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी वृद्धापणाने निधन झाले असून त्यांचा अंत्यविधी झिक्रि जामखेड रोडवरील ईकडे वस्ती येथे आज दि. २५ एप्रिल रोजी सायंकाळी झाला आहे.
मातोश्री आसराबाई यांच्या निधनाने ईकडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मागे पत्रकार शिवाजी ईकडे, निवेदक संभाजी ईकडे अशी दोन मुले, तिन मुली, सुना व नातवंडे असा परिवार मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने झिक्रि परिसरात शोककळा पसरली आहे.