सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना राज्यस्तरीय 'रुग्णमित्र पुरस्कार' जाहीर


महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 
जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना राज्यस्तरीय रुग्णमित्र पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना हा पुरस्कार १७ मे २०२३  रोजी प्रदान करण्यात येणार आहे. 

अनंत बहुउद्देशीय सेवा संस्थेचे अध्यक्ष एस् .एच .बेग आणी मिडीया पार्टनर म्हणुन एन्. टी. व्ही. न्युज मराठी अहमदनगर यांनी हा राज्यस्तरीय "रुग्णमित्र पुरस्कार" जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना जाहीर केला आहे.
  गेली तीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रात त्यांचे कार्य उल्लेखनीय असल्याने त्यांच्या कार्याचा आदर्श घेण्यासारखा आहे तसेच जनजागृती पर उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून बुधवार दिनांक १७ मे २०२३ रोजी दुपारी ११:००वाजता अहमदनगर येथील इंद्रायणी हॉटेल जवळील एन्. आर. लॉन येथे त्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 
तसेच यापुर्वी हि त्यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन साठ पुरस्कार मिळाले आहेत. आजपर्यंत पै.हबीब खान याकुबखान पठाण सेवाभावी संस्था जामखेड समाज रत्न पुरस्कार, पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर पोलीस मित्र, श्री संत तुळशीराम महाराज बहुउद्देशीय संस्था पिंपळगाव आळवा आरोग्य दूत, समस्त भीमसैनिक जामखेड कोरोना योद्धा, जामखेड पत्रकार संघ समाज भूषण, परम पूज्य श्री प्रीती सुधाजी शिक्षण फंड नाशिक समाजसेवक पुरस्कार, नवकार फाउंडेशन स्वच्छता दूत पुरस्कार, संत रोहिदास महाराज समाज मित्र पुरस्कार, जवळा विकास समूह समाज भूषण पुरस्कार, जामखेड तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोशियन समाज भूषण पुरस्कार,
स्वर्गवासी सेठ मांगीलाल मोहनलाल हिरालाल समदडिया वणी समाजसेवक पुरस्कार, आसे ६०
 पुरस्कार मिळाले आहेत. 

Post a Comment

Previous Post Next Post