डेल्टा वेटरीनरी डायग्नोस्टिक्स लॅब चे उद्घाटनपशुवैद्यकीय क्षेत्रात एक पाऊल पुढे


महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
जामखेडच्या इतिहासात प्रथमच पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉ. पांडुरंग नेटके यांनी एक पाऊल पुढे टाकून परिसरातील जनावरांच्या तपासणीसाठी अद्यावत तपासणी लॅब सुरू केली आहे. शासकीय दूध शीतकरण केंद्राच्या शेजारी डेल्टा वेटरीनरी डायग्नोस्टिक्स लॅबचे काल थाटात उद्घाटन झाले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. 
यापूर्वी पाळीव प्राण्यांना कोणत्याही साथीची अथवा रोगाची लागण झाल्यास त्यांचे रक्त लघवीचे 
नमुने तपासणीसाठी  शहराला पाठवण्याची गरज पडायची ग्रामीण भागातील पशुधन पालन करणाऱ्या शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन डॉ. पांडुरंग नेटके यांनी जामखेड येथे एक अद्यावत लॅब उभारण्याचा संकल्प केला. त्यानुसार 25 एप्रिल रोजी जामखेड येथे या लॅबचे सुरुवात झाली. आता जामखेड तालुका व शेजारील अनेक तालुक्यांना या तपासणी लॅबचा फायदा होणार आहे. यामध्ये आरोग्य विषयक रक्त, लघवी, दूध, गोचीडताप व इतर आजारांच्या तपासण्या केल्या जाणार आहेत. जनावरांच्या आजाराचे अचूक निदान होऊन त्यांना वेळेत पुढील उपचार मिळणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील व परिसरातील शेतकऱ्यांचा यातून निश्चितच फायदा होणार आहे. 
या उद्घाटन प्रसंगी जामखेड पशुधन विकास अधिकारी डॉ. संजय राठोड अंबी तालुका पशुधन अधिकारी डॉ. ओंकार देशमुख होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. ज्ञानेश्वर झेंडे होते. त्याचबरोबर पशुवैद्यक संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ. विठ्ठल राळेभात, पशुधन पर्यवेक्षक डॉ. धारकर, डॉ. आटोळे, डॉ. मंडलिकर, डॉ. पाचारणे, डॉ. आबा बोराटे, डॉ. अनुभुले, डॉ. गायतडक, डॉ. उबाळे, डॉ. भोरे, डॉ. मोरे, डॉ. विशाल बोराटे, डॉ. शिंदे, डॉ. लगस, डॉ. जगताप, आदी मान्यवर उपस्थित होते. आलेल्या मान्यवरांचे श्री.अर्जुन नेटके सर, संचालक डॉ. पांडुरंग नेटके, गणेश नेटके सर यांनी स्वागत केले. 

Post a Comment

Previous Post Next Post