नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांचा नागेश विद्यालयात सत्कार

 
महाराष्ट्र न्युज नेटवर्क :
   जामखेड तालुक्यातील सुपुत्र व नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांचा रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय येथे  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. 

   जामखेडचे गटशिक्षणाधिकारी पद हे गेली एक वर्षापासून रिक्त होते. या पदांवर तालुक्याचे सुपुत्र असलेले गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी पदभार स्वीकारला आहे. जामखेड येथील नागेश विद्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांच्या हस्ते श्री. धनवे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकचे संचालक संतोषकुमार राऊत, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य विनायक राऊत, विद्यालयाचे प्राचार्य बी. के. मडके आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. तसेच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदि मान्यवरही उपस्थित होते.
     नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे हे जामखेड तालुक्याचे सुपुत्र असल्याने तसेच यापुर्वी त्यांनी जामखेड तालुक्यात सेवा बजावल्याने तालुक्यातील शैक्षणिक परिस्थितीशी त्यांचा चांगला परिचय आहे.

Post a Comment

Previous Post Next Post