जामखेड बाजार समिती निवडणुकीत भाजपा व राष्ट्रवादी दोघांना समान जागा


महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 
   संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल हाती आले असून मतदारांनी दोन्ही आमदारांना समान कौल दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसला 9 व  भाजपला 9  जागा मिळाल्या. कर्जत बाजार समितीच्या निकालाची पुनरावृत्ती जामखेडला झालेली पाहायला मिळाली दोन्ही तालुक्यांनी दोन्ही आमदारांना समान कौल दिला आहे.

   जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार व  विधान परिषदेचे भाजप आमदार प्रा. राम शिंदे या दोन्ही आमदारांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली होती. जामखेडची बाजार समिती आपल्या ताब्यात राहण्यासाठी दोन्ही आमदारांनी शर्तीचे प्रयत्न केले. राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीसाठी एकुण १८ जागेसाठी ३८ उमेदवारांनी आपले भविष्य आजमावले. 
आज दि. ३० एप्रिल रोजी मतदान झाले. खर्डा, जवळा व आरणगाव या ठिकाणी एकुण ९८.४८ मतदान झाले
   कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड निवडणूकीचे झालेल्या मतमोजणीत भाजपचे 9 तर राष्ट्रवादीचे 9 उमेदवार विजयी झाले आहेत. विजय झालेले उमेदवार पुढील प्रमाणे

 राष्ट्रवादी विजयी 9 उमेदवार
1)सुधीर राळेभात
2)कैलास वराट
3)अंकुश ढवळे
4)सतिश शिंदे
5) नारायण जायभाय
6)रतन चव्हाण - (महीला राखीव) 
7)अनिता शिंदे- (महीला राखीव) 
8)सुरेश पवार - (व्यापारी) 
9)राहुल बेदमुथ्था (व्यापारी) 

भाजप विजयी 9 उमेदवार
1)गौतम उतेकर
2)सचिन घुमरे
3)विष्णू भोंडवे
4)गणेश जगताप
5)शरद कार्ले (ग्रामपंचायत) 
6) वैजनाथ पाटील (ग्रामपंचायत) 
7)नंदकुमार गोरे (ग्रामपंचायत) 
8)डॉ. सिताराम ससाणे (ग्रामपंचायत) 
9)बबन(उर्फ) रविंद्र हुलगुंडे (हमाल) 

सर्व विजयी उमेदवारांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. 



Post a Comment

Previous Post Next Post