अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 
अहमदनगर जिल्ह्याचे  नाव अहिल्यानगर करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला असून त्याची लवकरच अंमलबजावणी करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्याचबरोबर पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती जगाला हेवा वाटेल अशी साजरी करण्याचा संकल्प यावेळी त्यांनी केला. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे शासकीय उत्सव संपन्न झाला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे महसुल तथा पालकमंत्री   राधाकृष्ण विखे पाटील उपस्थिती होते.  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले "पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे काम व कर्तृत्व व जनतेसाठी केलेला त्याग मोठा असून त्यांनी हिंदूची अस्मिता असणारे मंदिर तसेच शेतकर्यांना गरजेचे असणारे , नद्या , बारव, तलाव  बांधून शेतकरी कसा सुखी राहील याकडे प्राधान्याने लक्ष दिले होते.अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य हिमालयाच्या उंचीचे होते, नामकरणामुळे नगरचे नावही हिमालयाएवढे उंचावणार असल्याचे ते म्हणाले. 

  पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले "सर्वसामान्य लोकांना न्याय देणारे सरकार असून शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना हि लागू करणार असून शेतकर्यांना वर्षाला  6000 हजार रुपये देणार आहे. तसेच विविध योजना शेतकर्यासाठी लागू करत असून मेंढी पालना साठी शासनाने पशुसंवर्धन 10 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. धनगर समाजातील मेंढपाळांसाठी हि योजना असल्याचे त्यांनी यावेळी त्यांनी सांगितले. ते म्हणाले आहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीच्या या ऐतिहासिक सोहळ्याचे आम्ही साक्षीदार झालोत हे आमचं भाग्य आहे. पुढे आहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी होणारी जयंती हि जगाला हेवा वाटेल अशी आपण साजरी करु. अहिल्यादेवींच्या मागच्या वर्षीच्या जन्मोत्सवात अहिल्यादेवी भक्तांना खूप त्रास झाला, मात्र, त्यानंतर २० दिवसातच आम्ही सरकार उलथून टाकले, असे सूचक भाष्य मुख्यमंत्री शिंदे यांनी मविआ सरकारचे नाव न घेता करताच उपस्थितांनी जल्लोष करीत प्रतिसाद दिला.
राज्यात शिंदे फडणवीस यांचे सरकार येताच औरंगाबाद चे छत्रपती संभाजी नगर तर उस्मानाबाद चे नामांकरण धाराशिव केले तसेच अहमदनगर चे नामकरण देखील अहिल्यानगर करणार आहेत . सर्वसामान्य लोकांना न्याय देणारे सरकार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय हे सरकार घेत आहे. असे मुख्यमंत्री म्हणाले. 

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सरकार हिंदुत्ववाद्यांचे असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर व धाराशिवचे नामकरणाचा निर्णय घेतला, त्याचप्रमाणे अहमदनगरच्या नामकरणही झालेच पाहिजे, मुख्यमंत्री त्यासंदर्भातील निर्णय घेतील. आपण मुख्यमंत्री असताना धनगर समाजासाठी १ हजार कोटी रुपयांचा निधी दिला होता. मात्र मध्यंतरी सरकार बदलल्यावर धनगर समाजाला एक फुटकी कवडीही दिली गेली नाही. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा एक हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. धनगर समाजासाठी दरवर्षी २५ हजार घरे बांधली जाणार आहेत. धनगर समाजाच्या मागण्या पुर्ण करण्यासाठी मला व मुख्यमंत्री शिंदे यांना अहिल्यादेवींचा आर्शीवाद मिळो .अशी सदिच्छा व्यक्त केली. अहिल्यादेवींच्या ठाही संघर्ष होता. तो आपल्याला समाजाच्या उत्कर्षासाठी करावा लागेल. धनगर समाजाच्या मनातील सर्व मागण्या आम्ही पुर्ण करणार आहोत. राज्यातील एकही धनगर बेघर राहणार नाही. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.तसेच राखीव चराई क्षेत्र ,धनगरवाड्यांना जोडणा-या रस्त्यांची तरतूद केली आहे. अहिल्यादेवी नसत्या तर या देशात काशी आणि शिवाची मंदिरे दिसली नसती. त्यांनी पायाभूत सुविधा उभारून सामान्य माणसाला न्याय दिला.न्यायप्रिय शासन त्यांनी चालवले. "

यावेळी अ.नगर दक्षिण खा. सुजय विखे, शिर्डीचे खा. सदाशिव लोखंडे, माजीमंत्री आण्णासाहेब डांगे, आ. बबनराव पाचपुते, आ. श्रीमती मोनिकाताई राजळे, आ. शिवाजीराव कर्डिले (चेअरमन, जिल्हा सहकारी बँक), आ. नारायण पाटील, आ. विकास महात्मे, आ. गोपीचंद पडळकर, माजी आमदार नारायण पाटील, रामहरी रूपनवर , पोपटराव गावडे, ,अनंतकुमार पाटील, रावराव वडकुते, भिमराव धोंडे, बाळासाहेब मुरकुटे , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे माहेरकडील वंशज बाबासाहेब शिंदे पाटील, उज्वला हाके ,डाॅ.शशिकांत तरंगे यांसह आजी माजी विधानसभा सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 प्रास्ताविक भाषणात आमदार प्रा राम शिंदे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चोंडी हे सर्वप्रथम प्रकाशझोतात आणण्याचे काम भाजपा शिवसेना युती सरकारनेच केले आहे. तत्कालिन मंत्री अण्णासाहेब डांगें यांनी अडगळीत पडलेल्या या जन्मभूमीत अनेक विकास कामांच्या माध्यमातून कायापालट केला. त्यामुळे आज चोंडीचे चित्र बदलताना दिसत आहे.
हाळगाव येथे ६५ कोटी रूपये खर्चुन सरकारी कृषी महाविद्यालय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने सूरू केले. सोलापुर विद्यापीठाचे नामांतर देवेंद्र फडणवीस यांनी यांनी करून अहिल्यादेवी होळकरांचे नाव दिले. त्याचबरोबर अहिल्यादेवी जयंती शासनाच्या वतीने साजरी करण्यासाठी निर्णय घेतला.

दरम्यान सामाजिक कार्यासाठी जिल्ह्यातील १४ तालुक्यातील  प्रत्येकी एका महिलेस  मुख्यमंत्री शिंदे  व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा दृकश्राव्य संदेश प्रसारित करण्यात आला.पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आभार मानले. 


पुढल्यावर्षी जयंतीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी.
आपल्या भाषणात आमदार प्रा राम शिंदे यांनी  चोंडी येथे देशाचे राष्टपती ,लोकसभा सभापती, अनेक केंद्रियमंत्री आणि अनेक मुख्यमंत्री येथे आले आहेत.मात्र फक्त प्रधानमंत्री चोंडीला आलेले नाहीत. त्यामुळे पुढल्यावर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे त्रिशताब्दी वर्ष म्हणून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना चोंडीत आणण्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

आमदार प्रा राम शिंदे यांनी अहिल्यादेवी नगर नामकरणाचा निर्णय घेण्याची विनंती मुख्यमंत्री शिंदे यांना केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्यक्षात घोषणा केल्यावर अहिल्या भक्तांनी फेटे व रुमाल उडवत व पिवळे झेंडे फडकावत अहिल्यादेवींच्या जयजयकार घोषणा देत जल्लोष केला.

Post a Comment

Previous Post Next Post