तायक्वांदो ब्लॅक बेल्ट दान प्रमोशन परीक्षेत बीडच्या ३५ खेळाडूंचे यश


अनेक राष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग 
बीड - औरंगाबाद येथे पार पडलेल्या ऑफिशियल ब्लॅक बेल्ट प्रमोशन परीक्षेमध्ये बीड जिल्हा संघटनेच्या ३५ खेळाडूंनी सहभाग नोंदवला असल्याची माहिती बीड जिल्हा तायक्वांदो संघटनेचे सचिव तथा राष्ट्रीय प्रशिक्षक डॉक्टर अविनाश बारगजे यांनी दिली.
      तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया या क्रीडा व युवक सेवा मंत्रालय ,भारत सरकारच्या मान्यताप्राप्त राष्ट्रीय खेळ संघटने अंतर्गत तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई आयोजित ऑफिशियल ब्लॅक बेल्ट दान प्रमोशन टेस्ट तथा राष्ट्रीय पंच परिक्षा सेमिनार २०२३ रत्नागिरी व औरंगाबाद येथे अनुक्रमे पार पडले. राष्ट्रीय पंच परीक्षा सेमिनार मध्ये बीडचे राष्ट्रीय खेळाडू देवेंद्र जोशी, ऋत्विक तांदळे, सुदर्शन गायकवाड, बाळासाहेब आंधळे व बालाजी कराड यांनी राष्ट्रीय ब्लॅक बेल्ट परिक्षा व पंच परीक्षा उत्तीर्ण केली आहे. संभाजीनगर (औरंगाबाद ) येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बॅडमिंटन हॉल येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ब्लॅक बेल्ट दान प्रमोशन टेस्ट मध्ये बीडच्या ३५ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. राष्ट्रीय खेळाडू असलेल्या बीडच्या सृष्टी कौशल्ले , सृष्टी योगे, यशस्वी चव्हाण, सृष्टी पवार, स्वराली शिरसीकर, प्रतिक्षा आमटे, स्वरांजली शिंदे , नेहा आंधळे, सलोनी जवंजाळ, ओजल ठोंबरे, पूर्वा मुंदडा, गौरी आनेराव, सार्थक भाकरे , यश चव्हाण, अभिषेक आमटे ,ओंकार परदेशी, ओम जगताप, सागर केळगंद्रे , अर्पित ठोंबरे, विठ्ठल ठोंबरे, श्लोक जेथलिया, मधुर मुंदडा, सिद्धार्थ काकडे, निखिल आंधळे, समर्थ आंधळे, अर्णव कांबळे , शौर्य बायस, अर्जुन गवते, पृथ्वीराज मुंडे, यशराज मुंडे, वैभव काळे, रुद्र पिंपळे या खेळाडूंनी सहभाग नोंदवून पुमसे, फाईट, सेल्फ डिफेन्स, ब्रेकिंग व फिटनेस टेस्ट आदी चाचण्या यशस्वीपणे या खेळाडूंनी पार केल्या. 

तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे , शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते तथा महासचिव मिलिंद पठारे, शासकीय तायक्वांदो प्रशिक्षक तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे , कोषाध्यक्ष व्यंकटेश कररा, उपाध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय पंच दुलीचद मेश्राम, अजित घारगे, संभाजीनगर तायक्वांदो संघटनेचे सचिव तथा राज्य कार्यकारणी सदस्य निरज बोरसे, सतीश खेमसकर यांची यावेळी उपस्थित लाभली . बीड संघाला यावेळी महिला प्रशिक्षिका जया बारगजे, सहप्रशिक्षक शेख अनीस यांनी मार्गदर्शन केले. बीड जिल्हा क्रीडा संकुलातील इंडोर मल्टीपर्पज हॉल येथे डॉ. अविनाश बारगजे यांच्या तायक्वांदो प्रशिक्षण केंद्रातील हे खेळाडू आहेत. 
     या सर्व खेळाडूंना डॉ. भारतभूषण क्षीरसागर , डॉ. योगेश क्षीरसागर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष नितीनचंद्र कोटेचा , दिनकर चौरे , सुनील राऊत, भारत पांचाळ, बन्सी राऊत, प्रसाद साहू , मनेष बनकर, नितीन आंधळे, पी टी चव्हाण, श्रीकांत पाटील , डॉ. विनोदचंद्र पवार आंतरराष्ट्रीय खेळाडू अविनाश पांचाळ, राष्ट्रीय खेळाडू सचिन जायभाये , नवीद शेख, सचिन कातांगळे, अमित मोरे आदींनी या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post