महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :- दिनांक १५-०८-२०२३ वार मंगळवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडेगाव येथे ७७ वा स्वातंत्र्य दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरी काढून झाली. पारंपारिक लेझिम नृत्य,घोषणा यांच्या आवाजाने अगदी परिसर दुमदुमून गेला.
प्रभात फेरी गावच्या कानाकोपऱ्यात फिरून आली व ग्रामपंचायत कार्यालयासमोर ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला.
शाळेत ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.ध्वजारोहण गावचे सुपुत्र *श्री.जयराम भोंडवे BSF कमांडर* यांचे हस्ते झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गावचे प्रथम नागरिक, सरपंच मा.श्री.शरद जगताप पा. यांनी भूषविले.
कार्यक्रमाची सुरुवात अखंड हिंदुस्थानचे आराध्या दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.
सांस्कृतिक कार्यक्रम अंतर्गत इयत्ता १ली व २ रीच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत गीतावरील नृत्याने झाली.
देशभक्तीपर गीता वरील लेझिम व टिपरी नृत्याने सर्वांची मने जिंकली.
इयत्ता सातवी इयत्तेच्या विद्यार्थिनींनी ओ देश मेरे हे गीत नृत्यासह सादर केले. या गीतांना भरघोस बक्षिसे मिळाली.
शाळेत लेझिम व टिपरी नृत्य बसवण्याची मेहनत घेतल्याने शाळेचे शिक्षक श्री. लिमकर राहुल सर यांचा गावच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास माजी सरपंच श्री.बाबासाहेब कांबळे, ग्रा. पं.सदस्य श्री.नारायण भोंडवे मा.ग्रा.पं. सदस्य श्री.खंडू भोंडवे, माजी विद्यार्थी श्री.बजरंग कचरे(जनरल रिझर्व्ह इंजिनीरिंग फोर्स) BRO, डॉ.तुकाराम भोंडवे पा., शा. व्य.समिती अध्यक्ष श्री.निलेश कचरे, शा. व्य.समिती माजी अध्यक्ष श्री.उद्धव काका जगताप, पालक महादेव भोंडवे आदी मान्यवर उपस्थित होते.
मिशन आपुलकी अंतर्गत शाळेस खालील प्रमाणे निधी प्राप्त झाला. ग्रामीण आरोग्य प्रकल्प जामखेड(CRHP), झेप फाउंडेशन,डायनॅमिक वूमेन ऑफ मिशिगन अमेरिका यांच्यावतीने शाळेतील विद्यार्थिनींना अंदाजे रक्कम 67500/- किमतीच्या 9 सायकल प्राप्त.
पालक श्री. लक्ष्मण भांगे यांचे कडून अंदाजे रक्कम 15000/- किमतीचे वॉटर प्युरिफायर 25ltr/hr प्राप्त.
पालक श्री.महादेव भोंडवे यांनी आपल्या मुलांच्या गुणवत्ता यादीत आले बद्दल दोन वर्गांना अंदाजे रक्कम 1500/- किमतीचे दोन घड्याळ दिले.
एकच ध्यास गुणवत्ता विकास असे मनात असणारे गावचे सरपंच श्री.शरद जगताप पा.यांनी इयत्ता पाचवीच्या मुलांसाठी अंदाजे रक्कम 4830/- रुपये किंमतीचे नवोदय परीक्षा तयारी साठी नवनीत प्रकाशनाची पुस्तके दिली.
ग्रामस्थ श्री.संजय जगताप पा.यांचे कडून शालेय किरकोळ दुरुस्तीसाठी अंदाजे रक्कम 700/- रुपये किमतीचे सिमेंट गोण्या दिल्या.
तसेच लेझिम, टिपरी स्वागत गीत व देशभक्तीपर गीता वरील नृत्यास एकूण 4351/- रुपये रोख स्वरूपात प्राप्त झाले.
शालेय विद्यार्थ्यांसाठी खाऊ स्वरूपात अंदाजे रक्कम 3000/- प्राप्त
असे एकूण रुपये 96881/- चा लोकसहभाग शाळेस आजच्या कार्यक्रमानिमित्त प्राप्त झाला आहे.
शाळेत डिजिटल शिक्षण मिळावे यासाठी शाळेची गरज समजून इंटरॲक्टिव बोर्ड साठी शाळेचे पालक तथा माजी विद्यार्थी श्री.जयराम भोंडवे BSF कमांडर यांनी 50000/- रुपये देण्याचे जाहीर केले तर उर्वरित आवश्यक रक्कम पालकांनी जमा करण्याचे जाहीर केले.
सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
विद्यार्थी मनोगते झाली.त्यानंतर पालक मनोगते झाली.
कार्यक्रमात अध्यक्षीय भाषण सरपंच श्री.शरद जगताप पा. यांचे झाले.
कार्यक्रमाचा शेवट गोड आभार प्रदर्शनाने झाला तसेच विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त खाऊ वाटप करण्यात आले.
कार्यक्रमासाठी पालक,ग्रामस्थ,अंगणवाडी सेविका,आरोग्यसेविका,मदतनीस व महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री.बडे सर, श्री. वराट सर , श्री. चव्हाण सर, श्रीमती ढेंगळे मॅडम उपस्थित होते.
तालुक्याचे प्रेरणा स्थान असलेले गटविकास अधिकारी आदरणीय श्री. पोळ साहेब,तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी आदरणीय श्री.धनवे साहेब,विस्तार अधिकारी आदरणीय श्री.चव्हाण साहेब, केंद्र प्रमुख श्री.घोडके साहेब यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
गावातील पालक, शाळा व्यवस्थापन समिती,ग्रामस्थ व ग्रामपंचायत मार्फत सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी यांचे भरभरून कौतुक केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक श्री. लिमकर सर यांनी केले तर आभार श्री.राऊत सर यांनी केले.
