जामखेड येथे जागतिक तायक्वांदो दिनानिमित्त खेळाडूंना प्रमाणपत्र व बेल्ट वितरण


जामखेड :- जागतिक तायक्वांदो दिनानिमित्त जामखेड येथील तायक्वांदो खेळाडूंच्या कलर बेल्ट एक्झाम संपन्न झाल्या अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या वतीने या परीक्षा घेण्यात आल्या

चार सप्टेंबर रोजी जागतिक तायक्वांदो दिन साजरा केला जातो यानिमित्ताने माजी सैनिक जगन्नाथ धर्माधिकारी मेजर यांच्या हस्ते व अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव संतोष बारगजे यांच्या उपस्थितीत बाजार तळ जामखेड येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरातील प्रांगणात बेल्ट व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

यावेळी धर्माधिकारी मेजर यांनी खेळाडूंना व्यायामाचे व शिस्तीबद्दल मार्गदर्शन केले ते म्हणाले आम्ही आर्मीत असताना आम्हाला व्यायामाचे महत्त्व कळाले प्रत्येकाने व्यायाम केला पाहिजे तरच शरीर चांगले राहील तुम्ही सर्व मुले बारगजे सरांकडे तायक्वांदोचे प्रशिक्षण घेत आहात ही अतिशय चांगली बाब आहे या वयामध्ये तुम्हाला योग्य संस्कार मिळतील व तुमचे भवितव्य नक्कीच चांगले असेल असे म्हणून त्यांनी सर्व खेळाडूंना तायक्वांदो दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी संतोष बारगजे यांनी जागतिक तायक्वांदो दिनानिमित्त खेळाडूंना शुभेच्छा देत खेळाविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी पुढील विद्यार्थ्यांनी विविध बेल्ट मध्ये यश संपादन केले
ब्ल्यू वन बेल्ट - सिद्धी संदिपान सांगळे
ब्ल्यू बेल्ट - सानिका कानिफनाथ नागरगोजे
ग्रीन बेल्ट - समाधान लक्ष्मण सदाफुले व श्रद्धा रोकडे
यलो बेल्ट - तेजश्री संदिपान सांगळे, प्राची दत्तात्रय माने, आदर्श विशाल समिंदर, शिवराज योगेश येवले, शिवतेज योगेश येवले, स्वराज प्रदीप जायभाये, अविनाश योगेश कानडे

वरील सर्व खेळाडूंना प्रमाणपत्र व बेल्ट देण्यात आले या सर्व खेळाडूंचे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष डॉ एकनाथ मुंढे उपाध्यक्ष किरण बांगर सहसचिव अल्ताफ कडकाले संजय बेरड दत्तात्रय उदारे सर यांनी अभिनंदन केले.

1 Comments

Previous Post Next Post