साकत येथे फळझाडासाठी बोर्डो मिश्रण प्रात्याक्षिके

     महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
अनेक दशकांपासून आलेले बोर्डो मिश्रण एक प्रभावी बुरशीनाशक आणि जीवाणूनाशक आहे. ज्याचा उपयोग, फळझाडासाठी करणे काळाची गरज आहे त्याचे प्रात्यक्षिक कृषीदुतानी साकत मध्ये शेतकऱ्यांना करून दाखविले. 

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय, हळगावच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम व वनस्पतिरोगशास्त्र विभाग अंतर्गत साकत ता. जामखेड येथे बोर्डो मिश्रण तयार करण्याच्या प्रक्रियेचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना करून दाखविले
बोर्डो मिश्रण तयार करताना तांबे,कॉपर सल्फेट
, चुना आणि पाणी यांचे मिश्रण एकत्र करून दाखविले. सदर मिश्रण हे एक प्रभावी बुरशीनाशक आणि जीवाणूनाशक आहे. ज्याचा उपयोग फळझाडे, द्राक्षांचा वेल आणि फळे यांच्या रोगांवर नियंत्रणासाठी अनेक दशकांपासून केला जात आहे.
       बोर्डो मिश्रण तयार करणे वाफरणे झाडाला लावतांना काळजी कशी घ्यावी यांची माहिती कृषिदुतांनी सांगितली. साकत येथे प्रामुख्याने सीताफळ व आंबा ही फळपिके घेतली जातात. त्यामुळे येथील शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन कृषिदूत महेश जाधव, साईप्रसाद गुट्टे, योगेश जाधव , अक्षय गुंजाळ, सुमित डोके ,अंशुल खाकरे ,स्वप्निल ढेकळे यांनी हे प्रात्यक्षिक सादर केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. जी. के. ससाणे, कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. ए. अनारसे, डॉ. डी. ए. सोनवणे, डॉ. एम. ए. गुंड, डॉ. एन. डी. तांबोळी, आदींचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post