पावसाने सोयाबीन पिके पाण्यात, पाझर तलावाची भिंतखचली, दुकानात पाणी शिरल्याने लाखोचे नुकसान

(फोटो - साकत परिसरात ढगफुटी सद्दश पावसाने अनेकाची सोयाबीन पिके पाण्यात गेली) 

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :-
     साकत परिसरात ढगफुटी सद्दश पावसाने अनेकाची पिके पाण्यात गेली महादवाडी शिवारात पाझर तलावाची भिंत खचली कोल्हेवाडीत विजेचे पोल पडले जामखेडला दुकानात पाणी शिरल्याने लाखोचे नुकसान. 

               (फोटो- पाझर तलावाची भिंतखचली) 

जामखेड तालुक्यातील साकत परिसरात तीन चार दिवसा पासुन मुसळधार पाऊस पडत असुन ढगफुटी सद्दश पावसाने ओढे - नाले - नदी भरून वाहू लागले आहेत अनेकाची सोयाबीन पीक पाण्यात गेली आहेत महादेवाडी शिवारातील पाझर तलावाच्या भिंत खचली असून कधीही फुटेल आशी भिती शेतकरी व्यक्त करीत आहेत . तसेच कोल्होवाडी शिवारातील महावितरणचे दोन पोल पडले असून दोन पोल वाकले आहेत .
    तालुक्यातील सर्वात उंचीवर गर्भगिरी बालाघाट डोंगराच्या रांगावर मराठवाड्याचे प्रवेश द्वार साकत गावाला तालुक्यात चेरापुंजी असे समजले जाते. दरवर्षी साकला जास्त पाऊस होतो मात्र या वर्षी सुरवातील पावसाने दाडी मारली पाऊस नसल्याने पिके वाय गेली मात्र तुटपुंजी आलेली पिके मात्र परतीच्या मुसळधार पावसाने राहीलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे . सोयाबीन चे कोठार म्हणून साकत गावची ओळख आहे. मात्र पिकांची मोठ्या प्रमानात नुकसान झाली आहे .
         (फोटो - दुकानात पाणी शिरल्या ने लाखोचे नुकसान) 

जामखेड शहरातील चोरडिया एजन्सी व खाडे ट्रेडर्स यांच्या दुकानात पाणी शिरल्याने चोरडिया एजन्सीचे व खाडे ट्रेडर्स यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने प्रशासनाने पंचनामे केले आहेत एजन्सी मालक चोरडीया यांनी सांगितले. 

साकत परिसरातील महादेवाडी येथील पाझर तलावावरून नागरीक जनावरे ये - जा करतात त्यामुळे अनर्थ होऊ शकतो त्यामुळे प्रशासनाने पाहणी करून ताबडतोप दुरुस्ती करावी 
गणेश मुरुमकर.   




Post a Comment

Previous Post Next Post