कोठारी प्रतिष्ठानच्या वतीने महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

 


जामखेड प्रतिनिधी -
जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि जामखेड येथील कोठारी प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.

जामखेड येथील कोठारी प्रतिष्ठाणच्या कार्यालयात झालेल्या संयुक्त जयंती कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, प्रदीप टापरे, अमित गंभीर ,स्वप्निल खाडे, सागर घुमरे उपस्थित होते

 सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले , प्रत्येक महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजरा करत असतो आज महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती करण्याचा आम्हाला योग आला तसेच यांच्या आदर्श घेऊन आम्ही आमचे कार्य चालू ठेवत आहोत.

यावेळी प्रदीप टापरे म्हणाले, कोठारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय कोठारी हे नेहमीच सर्व कार्यक्रम करत असतात अपघातातील लोकांना वाचवण्याचे मोठे कार्य त्यांचे हातून घडत असते.

 समाजसेवक अमित गंभीर म्हणाले, संजय कोठारी यांचे कार्य आम्ही डोळ्यांनी पाहत आहोत .प्रत्येक वेळेस काही ना काही जनहिताचे काम ते करत असतात. मुख्यता अपघातातील जखमींना त्यांची चोवीस तास मदत असते. महापुरुषांचे आदर्श घेऊन आम्ही सर्वजण काम करत आहोत.

Post a Comment

Previous Post Next Post