मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जामखेडला बंद ला शंभर टक्के प्रतिसाद


जामखेड वकील संघाच्या वतीने ठरावाचे पत्र देऊन जाहीर पाठिंबा
    महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या सहा दिवसापासून अंतरवली येथे मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी आमरण उपोषण उपोषण सुरू आहे. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली आहे. तरीही सरकारने त्यांच्या मागणीची दखल घेतली नाही. 


     त्यामुळे सरकारला येण्यासाठी व मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ जामखेड शहरासह तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी शहरातील छत्रपती संभाजी महाराज मार्ग,बीड काॅर्नर,विश्वक्रांती चौक, छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड,शिक्षक काॅलनी, मिलिंद नगर, कान्होपात्रा नगर,धर्मयोध्दा चौक, तपनेश्वर रोड, खर्डा चौक, जयहिंद चौक ते तहसील कार्यालय येथे समस्त मराठा समाज बांधवांच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.तसेच
तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   जामखेड शहर व तालुक्यात आज सर्व व्यवहार पूर्णतः बंद होते. दुकाने भाजी विक्रेते यांच्याबरोबरच खाजगी बँकांनी सुद्धा आज कामकाज बंद ठेवले होते. एकूणच आजच्या या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारलेल्या जामखेड बंदला आज 100% प्रतिसाद मिळाला. 


       जामखेड वकील संघाने कोर्टाचे आजचे काम काज बंद करून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास ठरावाचे पत्र देऊन पाठिंबा जाहीर केला.


Post a Comment

Previous Post Next Post