महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
जमादारवाडी जामखेड येथे असलेल्या संत वामनभाऊ महाराज मंदिरासाठी सौ सुरेखा एकनाथ मुंडे यांनी पाच हजार रुपये किमतीचे ग्रंथ भेट दिले आहेत.
श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड संचलित तसेच महंत विठ्ठल महाराज प्रेरित जामखेड शहरा जवळ असलेल्या जमादारवाडी परिसरातील श्री संत वामनभाऊ महाराज मंदिर येथे वर्षभर विविध उपक्रम चालतात. या गडासाठी कार्यरत असणारे दादासाहेब महाराज सातपुते यांच्या संकल्पनेतून दररोज सकाळी साडेसात वाजता यजमानांच्या हस्ते आरती करण्यात येते. एक जानेवारी ते 31 डिसेंबर असा दररोज एक जोडीचा म्हणजेच 365 यजमानांचा त्यांचा संकल्प आहे. त्यापैकी 261 महिलांनी आतापर्यंत सहभाग घेतला आहे. अकराशे रुपयाची एकदाच पावती करून या योजनेत सहभागी होता येते. व त्या यजमानांना वर्षभरातील एक तारीख सेवेसाठी दिली जाते. एकदा अकराशे रुपये देणगी देऊन पावती केल्यानंतर त्या यजमानांना पुन्हा वर्गणी देण्याची गरज नाही पावतीची रक्कम ही बँकेमध्ये मुदत ठेव (fix deposit) पावती केली जाते त्याचे त्या रकमेवर येणारे व्याज हे मंदिरातील किरकोळ खर्चासाठी वापरले जाते मूळ रक्कम मात्र तसेच बँकेतील खात्यात जमा राहते ती खर्च केली जात नाही केवळ व्याजावरच किरकोळ खर्च भागविला जातो अशा प्रकारची ही योजना असल्याचे सातपुते महाराज यांनी सांगितले या योजनेत आतापर्यंत 261 महिलांनी सहभाग घेतला असून इच्छुकांनी या योजनेत सहभागी होऊन लवकरात लवकर 365 दिवसांचा हा संकल्प पूर्ण करण्यास हातभार लावावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे
सौ सुरेखा एकनाथ मुंडे यांची सेवेची तारीख योगायोगाने त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी येते त्या दिवशी त्या आरती करायला आल्या असता त्यांनी आरती झाल्यानंतर मंदिरासाठी संत साहित्याचे ग्रंथ घेण्यासाठी पाच हजार रुपये देणगी दिली व हे ग्रंथ येथे येणाऱ्या साधकांसाठी उपलब्ध करून दिले.यावेळी हिरालाल नेटके, बिभीषण नेटके, रघुनाथ शेळके, प्रल्हाद नेटके, रामचंद्र कदम दत्तू आजबे रामहरी आजबे संतोष बारगजे आदी उपस्थित होते.