"नगर व्हिजन दिपावली विशेषांकांचे" शिवनेरी अकॅडमीची येथे प्रकाशन

 प्रा. मधुकर राळेभात व राजेंद्र कोठारी यांच्याहस्ते विविध ठिकाणी अनावरण

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : 
   गेली सलग सात वर्षे जामखेड येथून प्रकाशित होणाऱ्या नगर व्हिजनच्या आठव्या दिपावली विशेषांकांचे प्रकाशन त्रिदल आजी-माजी सैनिक संघाचे अध्यक्ष कॅप्टन लक्ष्मण भोरे, सचिव शहाजी ढेपे व उपाध्यक्ष कांतीलाल कवादे यांच्या सह विविध मान्यवर व उपस्थित सभासदांच्या हस्ते करण्यात आले. तसेच राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र कोठारी, प्रा. मधुकर राळेभात, भाजपा नगरसेवक अमित चिंतामणी व सनराईज शैक्षणिक फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. संजय भोरे यांच्या हस्ते विविध विविध ठिकाणी करण्यात आले.

 काल दि. १२ नोव्हेंबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी ७:०० वाजता शिवनेरी अकॅडमीच्या प्रांगणात व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नगर व्हिजन दिपावली विशेषांक २०२३ चे मोठ्या थाटात प्रकाशन करण्यात आले. यावेळी त्रिदल आजी-माजी सैनिक संघाचे अध्यक्ष कॅप्टन लक्ष्मण भोरे, सचिव शहाजी ढेपे, उपाध्यक्ष कांतीलाल कवादे, सदस्य अशोक चव्हाण, शिवाजी खाडे, रमेश मोरे, रमेश आजबे व शिवनेरी अकॅडमीचे प्रक्षिणार्थी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपापली मनोगते व्यक्त करून सर्वाना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. 
     तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांच्या हस्ते वर्धमान पतसंस्था येथे तर जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांच्या हस्ते रायझिंग स्टार्स क्रिकेट ॲकॅडमीच्या उद्घाटन प्रसंगी अनावरण करण्यात आले. या दरम्यान वर्धमान पतसंस्था येथे अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकचे संचालक संतोषकुमार राऊत, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, उपाध्यक्ष प्रा.राहुल आहिरे, बौद्धाचार्य आशोक आव्हाड, उमर कुरेशी, वर्धमान पतसंस्थेचे संचालक व कर्मचारी तर रायझिंग स्टार्स क्रिकेट ॲकॅडमीच्या येथे मंगेश आजबे,अजहर काझी, नगरसेवक शाकीर खान,अर्शद शेख,नरेंद्र जाधव,डॉ. कैलास हजारे, युवा नेते प्रवीण उगले, ॲड. प्रमोद राऊत, वसिम कुरेशी, सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, युवा कार्यकर्ते सचिन शिंदे, माजी सरपंच पै. बापूसाहेब कार्ले, सरपंच पप्पु कात्रजकर, उपसरपंच नागेश कात्रजकर, किशोर कांबळे, बापूसाहेब मडके, सागर होगाडे आदी मान्यवर व क्रिकेट प्रेमी यांच्या उपस्थितीत नगर व्हिजन दिपावली विशेषांक २०२३ चे अनावरण करण्यात आले. 
  तसेच नगरसेवक अमित चिंतामणी, डॉ. संजय भोरे व लोकमान्य नवीन मराठी शाळेचे संजय देशपांडे यांनाही प्रत्यक्ष अंक भेट देण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post