अमृता चौधरी शिष्यवृत्ती परीक्षेत तालुका गुणवत्ता यादीत चौथी तर तेलंगशी केंद्रात प्रथम, जि.प. नगर आयोजित मिशन आरंभ 2024 मध्ये केंद्र शाळा तेलंगशीचे यश

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
जि.प.अहमदनगर आयोजित व गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन आरंभ 2024 अंतर्गत जि.प.प्रा.केंद्र शाळा तेलंगशीने उल्लेखनीय यश मिळवले आहे.इ.पाचवी व इ.आठवी नवोदय व शिष्यवृत्ती पूर्वतयारी परीक्षेत इ.सातवीची विद्यार्थीनी कु.अमृता कल्याण चौधरी हिने 174 गुण घेऊन जामखेड तालुक्यात चौथ्या स्थानी तर तेलंगशी केंद्रात प्रथम क्रमांक तर जिल्ह्यात 43 वा क्रमांक पटकावला आहे.
    सातत्यपूर्ण अभ्यास, जि.प.ने आयोजित केलेला कृतीकार्यक्रम, पूर्वतयारी परीक्षा व शिक्षकांचे मार्गदर्शन यातून अमृताचा सराव होण्यास मदत झाली.
   या यशाबद्दल अमृताचे व शाळेतील सर्व शिक्षकांचे जामखेड तालुक्याचे कार्यक्षम गटशिक्षणाधिकारी श्री.बाळासाहेब धनवे साहेब,खर्डा बीट विस्तारअधिकारी संजय नरवडे साहेब,विस्तारअधिकारी सुनील जाधव साहेब, केंद्रप्रमुख केशव गायकवाड साहेब यांच्यासह  तेलंगशी ग्रामस्थांनी व केंद्रातील शिक्षकांनी अभिनंदन केले आहे..
   मुख्याध्यापक आनंद राऊत,जेष्ठ शिक्षक अनंता गायकवाड,पदवीधर शिक्षक संतोष गोरे व सुशेन चेंटमपल्ले यांच्यासह विजयकुमार रेणुके,लक्ष्मी जायभाय,अशोक जाधव व रविंद्र धस या शिक्षकांनी अमृताला मार्गदर्शन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post