ऑल इंडिया सैनिकी शाळा प्रवेश परीक्षा २०२४ मध्ये पिंपरखेड शाळेची दमदार कामगिरी


    प्रतिनिधी-  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरखेड तालुका जामखेड येथील विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया  सैनिक स्कूल एक्झाम 2024 मध्ये उत्तुंग यश मिळवत आमदार कामगिरी केली आहे.

स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी गटशिक्षणाधिकारी माननीय बाळासाहेब यांची प्रेरणा या विद्यार्थ्यांना मिळाली आहे.

यामध्ये
सार्थक भाऊसाहेब ओमासे 212 गुण
समर्थ संजय ढोले 200 गुण
अर्णव सुभाष ओमासे 181 गुण
संकेत सुभाष लबडे 179 गुण
सार्थक जालिंदर कदम 135 गुण

या विद्यार्थ्यांनी अतिशय मेहनतीच्या व जिद्दीच्या जोरावर या परीक्षेमध्ये उत्तुंग कामगिरी केली आहे.
त्यांना वर्गशिक्षक श्री सुभाष सरोदे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या या यशामध्ये त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री भगवान साळुंखे सर यांचा सिंहाचा वाटा आहे. 
तसेच पालक यांनीही अतिशय मोलाचे सहकार्य केले आहे.

या विद्यार्थ्यांच्या यशामध्ये मुख्याध्यापक श्री भोसले सर,श्री प्रवीण शिंदे सर, श्री सुभाष सरोदे सर, श्री कोथमिरे सर, श्री इंगोले सर, श्री मधुरकर सर व श्रीमती जरे मॅडम यांचेही मार्गदर्शन लाभले .

यांच्या या यशाबद्दल आपल्या तालुक्याचे गट विकास अधिकारी मा. श्री प्रकाश पोळ साहेब, गटशिक्षणाधिकारी मा.श्री बाळासाहेब धनवे साहेब, विस्ताराधिकारी मा. श्री सुनील जाधव साहेब, केंद्रप्रमुख श्री बडे साहेब यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post